अमळनेर शहरात विविध विकास कामांचे भुमिपूजन

0

अमलनेर : आमदार शिरीष चौधरी, कुशल कार्यसंकल्पक डॉ. रविंद्र चौधरी यांच्या प्रयत्नांतून तसेच अमळनेर नगरपालिकेचे माजी अध्यक्ष व उपाध्यक्षांसह सर्व नगरसेवक व नगरसेविकांच्या सहकार्‍याने गेल्या अडीच वर्षात अमळनेर शहराचा सर्वांगीण विकास केलेला असून त्यात पुन्हा भर पडली आहे. संपूर्ण अमळनेर शहरात 7 कोटींचे विविध विकास कामांचे भुमिपूजन समारंभ आयोजित करण्यात आला आहे. भूमिपूजन झालेले ठिकाण तांबेपुरा, नांदगाव रस्ता ते फिलॉसॉपी सेंटर हॉट मिक्स रस्ता 1 कोटी, इत्यादी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे.

भुमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्षा भारती चौधरी, पं.स. सभापती उदय नंदकिशोर पाटील, नगरसेविका कल्पना पंडित चौधरी, नगरसेविका आशा किरण बागुल, नगरसेवक देविदास महाजन, नगरसेवक नरेंद्र चौधरी, आरिफ भाया, सुरेश पाटील, नरेंद्र कांबळें, दीपक चौगुले, किरण गोसावी, योगराज संदाशिव, सुनील महाजन, श्रीराम चौधरी बांधकाम सभापती, सयाजीराव पाटील, सुभाष शिंपी, संदीप सैदाणे, महेंद्र पवार, प्रशांत पाटील, भूषण चौधरी, भरत पवार, महेंद्र रायसिंग, नारायण पाटील, संजय पाटील, फिरोज शेख, विजय नरवाडे, सुरेश सोनवणे, शुभम पवार, नागेश मद्रासी, पराग चौधरी, व परिसरातील नागरिक उपस्थित होते.