अमळनेर येथे शिक्षकांचा गुरू गुणगौरवाचे आयोजन

0

अमळनेर – महात्मा फुले यांच्या 125व्या स्मृति शताब्दी वर्ष व शिक्षक दिनानिमित्त नाशिक विभागीय स्तरावर शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदान व अध्यापनातील नाविन्यता नवीन उपक्रम व प्रकल्प राबविणार्‍या 71 शिक्षकांचा गुरु गुणगौरव सोहळा ओबीसी शिक्षण असोसिएशनच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष विलास पाटील यांनी दिली आहे. अमळनेर शहरातून वसुंधरा लांडगे यांना नाशिक विभागाचा गुणगौरव पुरस्कार घोषित झाला असून 12 रोजी गरुड वाचनालय धुळे येथे शिक्षक आमदार सुधीर तांबे यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक अ‍ॅड. ललिता पाटील तर अध्यक्ष विलासराव पाटील हे असणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड संभाजी पगारे तर प्रमुख पाहुणे डी.के.माळी, रामकृष्ण खलाने, डॉ. सुनिल महाजन, प्रा. एस.के. चौधरी, एस.एम.पाटील, आर.व्ही. पाटील, देवेंद्र पाटील, भाऊसाहेब मांडलिक, आर.डी. पाटील, प्रा. तिर्थदास अहिरे आदी उपस्थित राहणार आहेत तरी पुरस्कार्थींनी उपस्थित राहण्याचे ईश्वर महाजनफ यांनी केले आहे.