अमळनेर येथे तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

0

अमळनेर । शहरातील प.पु.साने गुरूजी ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे 22 ते 24 फेब्रुवारी 2017 तीनदिवशीय सानेगुरूजी स्मृती पुरस्कार वितरण व व्याख्यानमालेचे आयोजन सायंकाळी 6 वाजता जूना टाऊन हॉल येथे करण्यात आले आहे.

यावर्षीचा पु. सानेगुरुजी स्मृती पुरस्कार प्रताप हायस्कूलचे सेवानिवृत्त कला शिक्षक मार्तन्ड ओंकार शेलकर यांना जाहिर झाला आहे. ‘कला संस्कृती अध्यात्म’ या विषयावर ते प्रवचन देतात तर कलेची मुलतत्वे व स्मरणचित्रे आदी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले आहे. त्यांच्या साधू या व्यक्तिचित्राला राष्ट्रीय पारितोषिक मिळाला आहे.23 रोजी ‘आयत पोयत संख्यान’ हा विनोदी अहीराणी एकपात्रीचा 122वा प्रयोग प्रविण माळी हे सादर करणार आहेत. यावेळी भारतीय साहित्य अकादमीचा भाषा सन्मान पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक कवी कृष्णा पाटील हे प्रमुख अतिथी असतील 24 रोजी जयदीप पाटील दीपस्तंभ फाऊंडेशन यांचे मी वाचलेली माणसे आणि भेटलेली पुस्तके या विषयावर व्याख्यान होणार आहे. उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.