अमळनेर येथे आणखी १४ कोरोना बाधित; जळगावात एकूण ११४

0

जळगाव- जिल्ह्यातील अमळनेर येथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 64 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रूग्ण हे अमळनेर शहरातील आहे.  जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या ११६ इतकी झाली असून त्यापैकी सोळा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy