अमळनेर पोलीस वसाहतीत घाणीचे साम्राज्य

0

अमलनेर । स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्गत नगरपालिका क्षेत्रात संत गाडगे बाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान राबविण्याचा आदेश शासनस्तरीय असला तरी मात्र शहरातील बराच भाग हा दुर्लक्षित झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील पांचपावली देवी शेजारील पोलिस वसाहतीत घाणीचे साम्राज्य वाढले असून शहराचे रक्षण करणार्‍या रक्षकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पोलिस वसाहतीत गटारी रस्ते पथदिवे शौचालय अशा अनेक समस्यांनी डोके वर काढले आहे. या पोलिस वसाहतीत कोणत्याही आरोग्यदायी सोय सुविधा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने उपलब्ध करून दिल्या नसल्यामुळे कर्मचार्‍यांसह परीसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपालिकेने संबंधित विभागाकडे लक्ष देण्याची मागणी परीसरातील नागरीकांसह पोलीस कर्मचार्‍यांकडून होत आहे.