Private Advt

अमळनेर कृउबा उपसभापतींच्या घरातून पावणेदोन लाखांचा ऐवज लांबवला

0

अमळनेर- बाजार समितीचे उपसभापती अनिल अंबर पाटील यांच्या बंद घरातून चोरट्यांनी वावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना क्रांतीनगर भागात 3 ते 7 ऑक्टोबर दरम्यान घडली. अनिल पाटील हे शस्त्रक्रिया झाली असल्याने पुणे येथे रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून दाखल आहेत. क्रांतीनगरमधील घर बंद असल्याची संधी चोरट्याने साधत दोन्ही मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून तसेच दरवाजे तोडून एक लाख 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. अनिल पाटील यांच्या स्नुषा श्रुती पाटील पुणे येथून परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.