अमळनेर अपहरणकर्त्यांचे रेखाचित्र तयार

0

अमळनेर । शहरातील पार्थ बहुगुणेच्या अपहरण प्रकरणी पार्थने सांगितलेल्या वर्णनानुसार रेखाचित्रकाराकडून संबधित एका अपहरण कर्त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले असून तपासासाठी बडोद्याकदे रवाना झालेल्या पथकालाही काही धागेदोरे हाती लागल्याची माहिती पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी दिली आहे. पोलिसांच्या सक्षम यंत्रनेमुळे अपहरण कर्त्यांनी पार्थ ला सुखरूप सोडल्यानंतर पलायन केले होते सदर गुन्हेगारासंबधात पोलिसांना काही ठोस माहिती हाती लागल्यानंतर या आरोपींना पकडण्याचे आव्हान पोलिसांनी स्विकारले आहे. या पार्श्वभूमीवर घटनेच्या दुसर्याच दिवशी पोलिसांनी एक पथक बडोदा शहराकडे रवाना केले होते. तेथे अपहरणकर्ते ज्या मोबाइल सिमचा वापर केला ते सिम बडोदा येथिल एका शोरूम मध्ये मकेंणिक असलेल्या केसर्का नामक व्यक्तीच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

गुन्हेगार पोलिस लवकरच ताब्यात
गेल्या 10 दिवसांपासून जे गुन्हेगार जेल मधून सुटून आले असतील त्यानाही पोलिसांनी लक्ष केले असून पोलिस त्यांच्या मागावरहि आहेत. तर एका अपहरण कर्त्याचा चेहरा पार्थचा चांगलाच लक्षात असल्याने त्याने केलेल्या वर्णनानुसार अपहरण कर्त्याचे रेखाचित्र तयार असून लवकरच हे सर्व गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात असतील ऐसा विश्वास पोलिस उपविभागीय अधिकारी रमेश पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकात असुरक्षतेची भावना निर्माण झाली असून पोलिसांनी अमलनेरात प्रथमच घडलेली ही घटना एक आव्हान समजून स्विकारावे व गुन्हेगारांचे चेहरे उघड करावेत जेने करुण नागरिकांच्या मनातील भिती कमी होवून पोलिसांच्या विश्वासहार्यता वाढेल.