अमळनेरात हृदयरोग तपासणी शिबीराचे उद्घाटन

0

अमळनेर । गौरेश्वर जेष्ठ नागरिक संघ शहापूर व माधवबाग आयुर्वेद कार्डियाक क्लिनिक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे जेष्ठ नेते सुभाष चौधरी यांच्याहस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नायब तहसीलदार एस.एम. पाटील होते. त्यांचे सोबत व्यासपीठावर ढबू पाटील, पावबा पाटील, विठ्ठल माळी, भीमराव पाटील, दिनेश परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिरात इसीजी, रक्तदाब, मधुमेह, टीबी, क्षयरोग, संधिवात, मूळव्याध इत्यादी आजारांवर माधवबागच्या तज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून औषधोपचार मोफत देण्यात आले. शिबिरात परिसरातील शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतला. यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भानुदास पाटील व ओमस्वामी उद्योग समूह अमळनेर यांनी परिश्रम घेतले.