अमळनेरात मतिमंद विद्यालयात शालेय साहित्य वाटप

0

अमळनेर । 6 जानेवारी आद्य पत्रकार बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधुन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना अमळनेरच्याया वतर्फे 6 जानेवारी रोजी अमळनेर येथील विजय मारोती समोरील ममता मतिमंद विद्यालयात सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमास अमळनेरचे प्रांत अधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दरवर्षी संघटनेच्या माध्यमातून समाजभिमुक व विधायक कार्यक्रम घेतले जातात. सदर कार्यक्रमास पत्रकार बंधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले आहे.