अमळनेरात भाजपा व राष्ट्रवादीला दोन जागा

0

अमलनेर । येथील जिल्हा परिषद व् पंचायत समितीच्या मतमोजणी करुण निकाल इंद्रभवन मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड़ यांनी जाहिर केला त्यात जिप साठी भाजपा 2 तर राष्ट्रवादी 2 जागा तर पंचायत समिती साठी भाजपा 5 राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा निवडून आल्यात तर शिवसेना कांग्रेस व आ शिरीष चौधरी मित्र परिवार आघाडीस एकही जागा जिंकता आली.

पंचायत समिती गण निहाय मिळालेली मते
कळमसरे गणातून पाटील कविता प्रफुल्ल भाजपा (5507) विजयी झाल्यात तर कोळी सुरेखा राजेंद्र अपक्ष (881), कोळी हिरकन गंगाराम शिवसेना (378), पाटील आशाबाई उमाकांत राष्ट्रवादी (5475), पाटील विजया भिकन काँग्रेस (258) पराभूत झाले. जळोद गणातून पाटील प्रविण वसंत राष्ट्रवादी (5265) विजयी झाले आहेत तर पवार किरण भालेराव शिवसेना (1297), पवार नारायण दीपचंद भाजपा (4752), पाटील महेंद्र गुलाबअपक्ष (573) हे पराभूत झाले. पातोंडा गणातून मोरे सागर नथ्थू भाजप (3200) विजयी झाले तर बागुल निवृत्ती पुंजू राष्ट्रवादी (4241), मोरे किरणकुमार पुंडलिक कांग्रेस (316), मोरे विजय कृष्णा आघाडी (2770) हे पराभूत झाले. दहीवद गणातून जाधव विनोद नामदेव राष्ट्रवादी (5076) विजयी तर पाटील बंडू लक्ष्मण भाजप (2609), बोरसे मिलिंद वामनराव कांग्रेस (773), सोनवणे अतुल संभाजी आघाडी (2601) हे पराभूत झाले. मुडी प्र. डांगरी गणातून पाटील भिकेश पावभा भाजपा (5626) विजयी झालेत तर कोळी गोपीचंद सिताराम आघाडी (1399), पाटील पराग श्याम काँग्रेस (3961), पाटील विजय काशिनाथ शिवसेना (758) हे पराभूत झाले. मांडळ गणातून भील वजाबाई नामदेव भाजपा (4195) विजयी झाले तर भील निर्मला भाईदास राष्ट्रवादी (2097), भील वेणुबाई पांडुरंग चौधरी आघाडी (3544), शिरसाठ वंदना कांग्रेस (711) हे पराभूत झाले. जानवे गणातून पाटील रेखा भाजपा (6422) विजयी झाल्या तर पाटील विजया प्रकाश राष्ट्रवादी (4317). शिरुड गणातून पाटील त्रिवेणीबाई शिवाजी भाजपा (4878) विजयी झाले आहे तर पाटील अनिता नितिन काँग्रेस (863), पाटील कविता अर्जुन अपक्ष (429), पाटील प्रतिभा संतोष अपक्ष (304), पाटील मिराबाई निंबाजी आ शि चौ मित्र परिवार आघाडी (1202), पाटील विद्या महेंद्र राष्ट्रवादी (3246 ) हे पराभूत झाले आहे.

आ. चौधरी व जिल्हाध्यक्ष वाघ यांनी आत्मपरीक्षणाची गरज – अनिल पाटील
अमळनेर । जिल्हा परीषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील जनतेने चांगलेच सहकार्य केले. विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही सत्ताधारी आमदार हे एकमेकांचे पाठीराखे आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले आह, म्हणून जनतेने अमलनेर नपात आघाडीस बहुमत दिले जनतेच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसने तालुक्यात जि.प. 2 व पं.स.साठी 3 जागा मिळवल्या कांग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाची आघाडी झाली असती तर सर्व च्या सर्व जागा आघाडीने घेतल्या असत्या कळमसरे जळोद गटात बीजेपी उमेदवार निवडून यावा यासाठी विद्यमान दोन्ही आमदार व खासदार यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. परंतु जनतेने त्यांना नाराज केले जि.प. व पं.स.मध्ये जर राष्ट्रवादीचा पराभूत झाल्यास जिल्हाध्यक्ष पदाचा राजिनामा देण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी जाहिर केले होते. त्यांनी आता राजीनामा द्यावा नगरपालिकेत भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले तर एक नगरसेवक निवडून आले. यावर जिल्हाध्यक्ष यांनी आत्मपरीक्षण करुण राजीनामा द्यावा, असे राष्ट्रवादी नेते अनिल पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जिप गट निहाय मिळालेली मत
कळमसरे – जळोद गटात पाटील जयश्री अनिल राष्ट्रवादी (12964) विजयी झाल्या तर पाटील सिंधुबाई प्रताप काँग्रेस (368), पाटील स्वाती विनायक भाजपा (10833) यांचा पराभूत झाला आहे. पातोंडा – दहीवद गटातून पाटील मीना रमेश राष्ट्रवादी (10947) विजयी झाले तर जाधव प्रतिभा हर्षल काँग्रेस (1294 ), पाटील ममताबाई मिलिंद भाजप (9236) या पराभूत झाले. मुडी प्र. डांगरी – मांडळ गटातून भील संगीता भिका भाजपा (9600) विजयी झाले तर चव्हाण ताराबाई रमेश राष्ट्रवादी (5100), भील जिजाबराव हरसिंग चौधरी परीवार आघाडी (4443), भील सुनंदाबाई संतोष कांग्रेस (2995) हे पराभूत झाले. जानवे- शिरुड गटातून पवार सोनू राजू भाजप (12087) विजयी झाले तर भील रत्नाबाई अंबीर कांग्रेस (608), भील सरला मानसिंग चौधरी आघाडी (1962), सोनवणे ललिता जगदीश राष्ट्रवादी (7817) हे पराभूत झाले आहे.