अमळनेरात भाजपाला खिंडार नाहीच

0

अमळनेर । अनिल पाटील यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने भारतीय जनता पार्टीला खिंडार वैगरे काहीच नाही, असे माजी आ.डॉ.बी.एस.पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यात भाद्रपद महिन्यात पितृ पक्षात जसे कावळे एका छता वरुण दुसर्‍या छता वर घिरट्या घालतात तशा निवडणुकाजवळ आल्या म्हणजे काही कार्यकर्ते आयाराम गयाराम होतात हे राजकारण काही नविन नाही आणि त्यासाठी कोणताही पक्ष अपवाद नाही. गेल्या पंधरा वर्षापासून पक्षाने अनिल पाटील यांच्यावर कोणताच अन्याय केला नाही.

इतर कार्यकर्ते निष्क्रीय असल्याचा आरोप
अनिल भाईदास पाटील यांनी भाजपात असतांना त्यांना हवे तेव्हा त्यांनी पक्षाविरुद्ध भूमिका उठविल्या म्हणून पक्षातून त्याची गच्छन्ति अटळ होती. त्याला कुणीही जबाबदार नसून त्याचे वर्तनच जबाबदार होते. त्यामुळे त्यांना कोणत्याही पक्षाचा सहारा घेणे गरजेचे आहे. शेवटी समाज शिलेषु सख्यम भवती ह्या नैसर्गिक तत्वानुसार त्यांनी माजी आमदार साहेबराव पाटील यांचा हात धरून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे त्यांनी भाजपातून राष्ट्रवादीत गेल्यानंतर कुणालाही राग यायला नको. त्यात वागवे काहीच नाही त्याच्यासोबत काही नाराज काही निष्क्रिय पाच पंचविस कार्यकर्ते ही चालते झाले. त्यामध्ये कुणीही विद्यमान सक्रिय कार्यकर्ता नाही. पक्ष हा रेल्वेगाडी सारखा असतो. त्यात कोण चढल कोण उतरल याचा गाडीला काही फरक पडत नाही. अनिल पाटील शेवटी स्वतःला माझा शिष्य समजतो आणि तोही माझ्या सारखाच एक दिवस पक्षात परत येईल याची मला खात्री आहे.