Private Advt

अमळनेरात बंद घर फोडत चोरट्यांनी 25 हजाराची रोकड केली लंपास

अमळनेर : शहरातील वैदुवाडा परीसरात बंद घर फोडून चोरट्यांनी 25 हजारांची रोकड लांबवली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमळनेर पोलिसात गुन्हा
संजय प्रभाकर सैंदाणे (30, ताडेपुरा, मंगल नगर, वैदुवाडी, अमळनेर) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवार, 20 एप्रिल रोजी मध्यरात्री दीड ते दोन वर्षे दरम्यान ताडेपुरा भागातील संशयीत आरोपी सुनील दगडू गव्हाणे आणि एक जण अनोळखी अशा दोघांनी बंद घरात घुसून दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील 25 हजार रुपयांची रोकड लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर संजय सैंदाणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुनील पाटील करीत आहेत.