अमळनेरात फलकावर चिखलफेक प्रकरणी प्रांताधिकार्‍यांना निवेदन

0

अमळनेर : तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत जगनाडे महाराजांच्या फलकावर केलेल्या चिखलफेक प्रकरणी शहरातील विविध समाजातील संघटनेने निषेध व्यक्त करित प्रांताधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश पवार उपस्थित होते. शहरातील संशयीत समाजकंटकांवर कठोर कार्यवाही करून अटक करावी अन्यथा या मोर्चाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात राहिल, असे निवेदनकर्त्यांनी सांगीतले. शहरात जातीय सलोखा कायम रहावा हा हेतू ठेवून आजचा भव्य मोर्चा तूर्त स्थगीत केला असल्याची माहिती पंच मंडळाच्या सदस्यांनी दिली. येथील बाजार समितीच्या मागील बाजूला असलेल्या गूरूकृपा कॉलनी भागात तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या फलकावर 7 जानेवारी राजी अज्ञात समाजकंठकांनी फलकावर चिखल फेकुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या माथेफिरूंना अटक होऊन शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी तेली समाज बांधवांनी केली.

कारवाईची केली मागणी
या विषयीची तक्रारीचे निवेदन पोलीसांना देण्यासाठी डॉ. रविंद्र चौधरी, सूभाष चौधरी यांचे नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शांततेत जाऊन निवेदन दिले. यावेळी श्री क्षत्रीय माळी समाज, डॉ बाबासाहेब सामाजिक परिषद, आदिवासी पारधी समाज, यूवा परिट धोबी समाज, आदर्श भोई विकास मंच, प्रबूध्द यूवामंच, परवेज फांऊडेशन मूस्लीमसंघटना आदी विविध सामाजिक परिषद संघटनांनी लेखी निवेदना द्वारे निषेध नोंदविला. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला कठोर कारवाई करून समाजात तेढ निर्माण करणार्‍यांवर कार्यवाही करावी

समाजबांधवाची उपस्थिती
यावेळी नगरसेवक नरू चौधरी, श्रीराम चौधरी, पंकज चौधरी, चेतन चौधरी, राकेश चौधरी, सूरेश चौधरी, किरण बागूल, पराग चौधरी, पवन चौधरी, सूरेश चौधरी, रविंद्र चौधरी, शांताराम चौधरी, अरूण चौधरी, प्रविण चौधरी, श्रावण चौधरी, हेमंत चौधरी, दिपक चौधरी, अरूण नेरकर, के.डी. चौधरी, श्याम संदानशिव, गुलाम नबी, सोनू चौधरी, संजय चौधरी, निंबा चौधरी, देविदास नेरकर यांच्यासह असंख्य समाजबांधव उपस्थित होते. समाजातील जमलेल्या युवकांच्या भावना डॉ.रविंद्र चौधरी व सूभाष चौधरी यांनी अधिकार्‍यां समोर मांडल्या. पोलीसांनी यातील दोषी समाजकंटकांना शोधून कठोर कार्यवाही करावी. अशी मागणी केली.