अमळनेरात पुन्हा चार कोरोना बाधित रूग्ण आढळले

0

जळगाव – जळगाव व अमळनेर येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या चार व्यक्तीमध्ये 31, 43 व 60 वर्षीय महिलांचा तर 48 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे चारही रूग्ण अमळनेर येथील आहेत. निगेटिव्ह व्यक्तीमध्ये 14 व्यक्ती या अमळनेर येथील तर दोन व्यक्ती जळगाव च्या आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 57 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Copy