Private Advt

अमळनेरात तरुणीला मारहाण करीत विनयभंग : तक्रारीनंतर राग अनावर

अमळनेर : पोलिसात तक्रार दिल्यानंतर झालेल्या रागाच्या भरात तरुणीला मारहाण करण्यात आली व तिचा विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी एकाविरोधात अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात तक्रार दिल्यावरून मारहाण
अमळनेरातील एका भागातील तरुणी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून मंगळवार, 26 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता तरुणी आपल्या कुटुंबियांसोबत अंगणात गप्पा मारत असताना पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून संशयीत आरोपी नरेंद्र नाना चौधरी याने तरुणीला शिविगाळ करीत मारहाण केली तसेच विनयभंग केला. या प्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात नरेंद्र चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक सुनील महाजन करीत आहे.