अमळनेरात डॉक्टर्स करणार मोफत तपासणी

0

अमळनेर : सर्दी ताप खोकला असणाऱ्या रुग्णाची इंदिरा गांधी शाळेत शहरातील डॉक्टर मोफत तपासणी करणार आहेत. आमदार अनिल पाटील, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

शहरातील सर्व खाजगी डॉक्टर्सकडे येणाऱ्या सर्व रुग्णांना या ठिकाणी पाठवण्याची सूचना करण्यात येणार असुन त्या सर्वांची नोंद घेतली जाणार आहे. सर्दी खोकला ताप अशा लक्षणे आढळलेल्या रुग्णांची सकाळी 10 ते 1 तपासणी होणार आहे. याठिकाणी इतर तपासण्या होणार नाहीत.

यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप वायाळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन, डॉ अविनाश जोशी, डॉ संदीप जोशी, डॉ निखिल बहुगुणे, डॉ किरण बडगुजर, प्रशांत शिंदे आदी उपस्थित होते.