अमळनेरात चोरट्यांचा सुळसुळाट; एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोडी

0

अमळनेर : तालुक्यातील धार येथे २ रोजी मध्यरात्री तब्बल सात ठिकाणी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील नामदेव पाटील, अनिल नामदेव पाटील, मनीषा प्रकाश पाटील, योगेश मुकुंदा पाटील, आफसीन कहरसिंग बारेला, तायराबी गयासोद्दिन मुजावर, शेख अल्ताफ शेख इस्माईल आदी सात व्यक्तींच्या घरी चोरी झाली आहे. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान केल्याचे देखी उघड झाले आहे. मारवड पोलिसात कलम ४५७, ३८०, ४२७ अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास सपोनि राहुल फुला हे करीत आहेत.

चोरी झालेली रक्कम

सुनील पाटील यांच्या घरी ८० हजार रुपये किंमतीचा २० ग्रॅम सोन्याचा गोफ, २० हजार किमतीचे ५ ग्रॅम सोन्याचे टोंगल, १५ हजार किमतीचे ३ ग्रॅम सोन्याचे कानातील काप, ३५०० रुपये किमतीचे चांदीचे कडे, ५० हजार रुपये रोख रक्कम चोरी गेली आहे.

अनिल पाटील यांच्या घरी २० हजार रुपये किमतीचे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, १६ हजार रुपये किमतीच्या ४ ग्रॅम वजनाचे कानातील रिंगा, १२०० रुपये किमतीची चांदीची चैन चोरीला गेली आहे.

मनीषा पाटील यांच्या घरी ८३०० रुपये किमतीचा मोबाईल, चोरीला गेला आहे.

योगेश पाटील घरातून १२०० आणि ६००० रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरीला गेले आहे.

आफसीन बारेला यांच्या घरातून ५ हजार रुपये चोरीला गेले आहे.

तायराबी मुजावर यांच्या दुकानातून २१०० रुपयाचा किराणा माल आणि २००० रुपये रोख चोरीला गेले आहे.

शेख अल्ताफ शेख इस्माईल यांच्या दुकानातील ५ हजार रुपये किमतीचा किराणा माल चोरट्याने चोरला आहे.