अमळनेरहून परततांना एकनाथराव खडसेंच्या वाहनाचा अपघात

0

*धरणगाव-* अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून जळगावकडे परतत असतांना एकनाथराव खडसे यांच्या खाजगी वाहनाचे टायर फुटून अपघात झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 5 .30 वाजेच्या सुमारास धरणगाव- जळगाव महामार्गावर घडली. वाहनात खडसे सोबत त्यांचेही स्वीय सहाय्यकही होते. सुदैवाने कुणालाही काहीही दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळाली आहे.

अमळनेर येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज जिल्हा दौर्‍यावर होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँगे्रसेचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रम आटोपून एकनाथराव खडसे हे त्यांच्या खाजगी वाहनाने एम.एच.19 सी.ई. 19 ने जळगावकडे परतत होते. यादरम्यान धरणगाव व जळगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या वाहनाचे अचानक टायर फुटले. चालकाने प्रसंगवधान राखून चारचाकीवर नियंत्रण मिळविले. व गाडी थांबविली. सुदैवाने या अपघातात एकनाथराव खडसे हे बालंबाल बचावले आहे. अपघातानंतर अपघातग्रस्त वाहन जागेवरच उभे करुन खडसे दुसर्‍या वाहनाने जळगावकडे रवाना झाले. या वाहनात खडसे सोबत त्यांचेही स्वीय सहाय्यकही होते. सुदैवाने कुणालाही काहीही दुखापत झालेली नसल्याचे वृत्त आहे.

Copy