अमळनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी केले जल्लोष

0

अमळनेर । उत्तर प्रदेशसह देशातील इतर पाच राज्याचा निकाल शनिवारी 11 रोजी घोषीत झाला. यात देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष नंबर एकचा पक्ष ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी नोटाबंदी जाहिर केली असल्याने संपुर्ण देशात भाजपा विरोधी वातावरण असतांना भाजपाला पाच पैकी तीन राज्यात भाजपाला बहुमत मिळाले आहे. या अभुतपूर्व यशाचा भाजपातर्फे आनंद साजरा करण्यात येत आहे.

भाजपा पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष
शनिवारी अमळनेर येथील शासकीय विश्रामगृहासमोर सायंकाळी 4 वाजता शहर व तालुका भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भाजपला बहुमत मिळाले असल्याने अमळनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे. यावेळी माजी आमदार डॉ. बी.एस. पाटील, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अ‍ॅड.व्ही. आर. पाटील, दिनेश नाईक, लालचंद सैनानी, सुभाष चौधरी, शाम अहिरे, शहराध्यक्ष हरचंद लांडगे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष राकेश पाटील, महेश पाटील, प्रल्हाद पाटील,दीपक पाटील, महेश पाटील, नाटेश्वर पाटील, शाम अहिरे, झुलाल पाटील, जाकिर शेख, कैलास भावसार, कामराज पाटील, जिजाबराव पाटील, श्रीनिवास पाटील, पंकज भोई, कल्पेश पाटील, हिरालाल पाटील आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते