Private Advt

अमळनेरच्या विवाहितेचा छळ : पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा

अमळनेर : दुकान टाकण्यासाठी माहेरुन पाच लाख रुपये न आणल्याने अमळनेर येथील माहेर व अहमदाबाद येथील सासर असलेल्या विवाहितेचा छळ करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच जणांविरोधात गुन्हा
अमळनेर येथील माहेर असलेल्या करुणा अमूल पाटील (25) यांचा विवाह माहेश्वरी नगर, तक्षशिला अहमदाबाद येथील अमुल नथ्थू पाटील यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला मात्र पती अमुल पाटील याने माहेरहून पाच लाख रूपये दुकाना टाकण्यासाठी यासाठी तगादा सुरू केला. माहेरची परीस्थिती हालाखीची असल्याने पैसे न आणल्याने छळ करून मारहाण करण्यात आली व या प्रकाराला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या व त्यांनी अमळनेर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर पती अमुल नथ्थू पाटील, सासरे नथ्थू सुकलाल पाटील, सासू सुनंदा नथ्थू पाटील, ननंद स्वाती नथ्थू पाटील, दीर राहूल नथ्थू पाटील (सर्व रा.अहमदाबाद, गुजरात) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार सुनील हटकर करीत आहे.