अभ्यासाच्या तणावातून विद्यार्थिनीची आत्महत्या

0
चिंचवड : प्रतिनिधी अभ्यासाच्या तणावातून एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी (दि.2) दुपारी बाराच्या सुमारास वाल्हेकरवाडीत मृत तरुणी राहत असलेल्या घरात घडली. आत्महत्येपूर्वी स्वप्नाने चिठ्ठी लिहिली होती.स्वप्ना पवार (वय 17, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ रा. लातूर) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चुलत्याकडे होती शिक्षणासाठी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्ना ही शिक्षणाठी वाल्हेकरवाडी येथील तिच्या काकांकडे राहायला होती. ती बीएससीच्या पहिल्या वर्षात तेलंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास तिने घरात आत्महत्या केली. त्यावेळी घरात काकू असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती त्वरीत चिंचवड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन दरवाजा तोडला आणि स्वप्नाला रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत स्वप्नाचा मृत्यू झाला होता. या आत्महत्येस कोणी जबाबदार नाही. मला अभ्यास जड जात आहे. त्यामुळे मी आत्महत्या करत आहे. तसेच पोलिसांनी कोणाला त्रास देऊ नये असे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत स्वप्नाने नमूद केले आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.
Copy