अभिषेक पाटलांकडून आर्थिक लुटीचा डाव फसला

0

हनी ट्रॅप प्रकरण: मनोज वाणी यांचे आरोप

खंडणी वसुलीसाठी घेतला महिलेचा आधार; राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून पुरावे देणार

जळगाव: राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी मला हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप पत्रकार परिषदेत केले होते. राजकीय हेतूने व्यावसायिक मनोज वाणी यांनी एका महिलेला सुपारी देऊन हनी ट्रॅप घडवून आणल्याचे आरोप त्यांनी केले होते. दरम्यान मनोज वाणी यांनी या आरोपांचे खंडण केले असून अभिषेक पाटील यांच्याकडून हनी ट्रॅपच्या नावाखाली मनी ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला.अभिषेक पाटील यांनी केलेला आर्थिक लुटीचा डाव फसला म्हणून त्यांनी हनी ट्रॅपचा बनाव केल्याचा आरोप मनोज वाणी यांनी आज गुरुवार २९ रोजी पत्रकार परिषद घेऊन केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेऊन पुरावे देणार असल्याचेही वाणी यांनी सांगितले.

पुरावे सार्वजनिक करणार
व्यावसायिक मनोज वाणी यांच्यावर काही दिवसांपूर्वी हनी ट्रॅप रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू आपल्याकडे कोट्यावधीची खंडणी मागितली गेली होती आणि हे प्रकरण अंगाशी येत असल्याचे दिसल्यानंतरच अभिषेक पाटील यांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला. याबाबत माझ्याकडे पुरावे आहेत, हे पुरावे वरिष्ठांशी चर्चा करून सार्वजनिक करणार असल्याचेही मनोज वाणी यांनी सांगितले.

महिलेचा पोलिसांत जबाब
अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत एका महिलेचा नावाचा उल्लेख केला होता. ‘मनोज वाणी यांनी हनी ट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी सुपारी दिली असल्याचा उल्लेख पत्रकार परिषदेत करण्यात आला. मात्र संबंधित महिलेने पोलीस स्टेशनमध्ये कोणीही अभिषेक पाटील यांना अडकविण्यासाठी सुपारी दिली नसल्याच जबाब दिला असल्याचा दावा मनोज वाणी यांनी केला आहे. हे प्रकरण बनावट असल्याचेही आरोप वाणी यांनी केले आहे.

महिलेला आर्थिक प्रलोभन
माझ्याकडून खंडणी लुटण्यासाठी अभिषेक पाटील यांनी महिलेला सोबत घेतले आहे. मात्र त्यांचा हा डाव फसला, त्यामुळेच हनी ट्रॅपचे प्रकरण समोर आणले गेले. अभिषेक पाटील यांनी घडविलेल्या हनी ट्रॅपच्या कथानकावेळी मी जळगावात नव्हतो, व्यवसायानिमित्त आंध्रप्रदेश (विजयवाडा) येथे होतो असा खुलासाही मनोज वाणी यांनी केला आहे. नोकरी लावून देण्याच्या आमिषाने अभिषेक पाटील यांनी माजी सैनिकांच्या परिवाराची फसवणूक केली आहे, याचेही पुरावे आपण वरिष्ठांकडे देणार असल्याचे वाणी यांनी म्हटले आहे.