अभिनेता संजय दत्तला कॅन्सर डिटेक्ट; ‘स्टेज थ्री’त पोहोचला

0

मुंबई: बॉलीवूड अभिनेत्यांच्या बाबतीत हे वर्ष फार वाईट राहिले आहे. अनेक बॉलीवूड कलाकारांचे यावर्षी निधन झाले आहे. अभिनेता ऋषी कपूर, इम्रान खान, सुशांतसिंह राजपूत यांचे यावर्षात निधन झाले. त्यामुळे बॉलीवूड चाहत्यांना धक्का बसला आहे. दरम्यान आता बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार संजय दत्तला कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. फुफ्फुसासंबंधीचा कर्करोग झाल्याचे समोर आले असून आता तो स्टेज थ्रीमध्ये पोहोचला आहे. स्टेज थ्री हा आरोग्याच्या दृष्टीने घातक मानले जाते.

पुढील उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना होण्याची शक्यता आहे. संजय दत्त यांची पत्नी मान्यता दत्त दुबईहून परतली असून लवकरच अमेरिकेला जाण्याची तयारी केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने संजय दत्त यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांना कर्करोग झाल्याचे समोर आले आहे.

‘संजय दत्तने ट्वीटरवरून मी वैद्यकीय उपचारासाठी काही काळ विश्राम घेत आहे, माझे चाहते, माझा परिवार माझ्यासोबत असून माझ्या आरोग्यासाठी प्राथना करा. मी लवकरच परत येईल’ अशी पोस्ट केली आहे.

दरम्यान आजच ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट दिग्दर्शित सडक-२ या चित्रपटाचे ट्रेलर रिलीज झाला आहे. यात संजय दत्त मुख्य भूमिकेत आहे. ट्रेलर रिलीज झाल्याचा आनंद चाहत्यांमध्ये असताना संजय दत्त यांना कर्करोग झाल्याची बातमी आल्याने चाहत्यांच्या आनंदात विरजण पडले आहे.सडक-२ मध्ये आलिया भट, आदित्य रॉय कपूरही मुख्य भूमिकेत आहेत.