अबब ! मुंडेंची संपत्ती किती माहितीये का ?

मुंबई : गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे , राष्ट्रवादीचे नेते आणि सध्या महाविकास आघाडीमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून मुंडेंची संपत्तीच मांडली आहे.ज्यात त्या म्हणाल्या आहेत मी एक आमदाराची पत्नी आहे. माझे पती धनंजय मुंडे मंत्री आहेत. जेव्हा माझे पती विधानपरिषद आमदार होते तेव्हा परळीमध्ये तीन बंगले, एक फार्म हाऊस, पुण्यात दोन मोठमोठे बंगले आणि मुंबई आमचे दोन मोठमोठे फ्लॅट आहेत.एक नरीमन पॉईंटला एक सांताक्रूझला आहे.