अबब…. जिल्ह्यात नवीन 217 कोरोनाबाधीत रुग्णांची भर

0

जळगावात सर्वाधिक 92 रुग्ण आढळले.

जळगाव- जिल्ह्यात तब्बल 217 कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या 4 हजार 803 झाली आहे. जळगावात मंगळवारी सर्वाधिक 92 कोरोनाबाधीत रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

आज नव्याने 217 रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर 92 , जळगाव ग्रामीण 11, भुसावळ 6, अमळनेर 1, चोपडा 11, भडगाव 5, धरणगाव 2, यावल 6, एरंडोल 3, जामनेर 5, रावेर 15, पारोळा 26, चाळीसगाव 18, बोदवड 15 व अन्य जिल्ह्यातील 1 याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात 11 बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील 3, रावेर तालुक्यातील 3, जळगाव तालुक्यात 2, चाळीसगाव, एरंडोल व जामनेर तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

Copy