Private Advt

अबब ! जिल्हातील तळीरामांनी रिचवली सव्वातीन कोटी लिटर दारू

 

 

जळगाव । चिन्मय जगताप ।  कोरोना काळात जळगाव जिल्हातील मद्यपींनी कोरोना काळात तब्बल ३ कोटी १६ लाख ६ हजार २२ लिटर इतकि दारू रिचवली आहे. ज्यात १ कोटी १० लाख ८७ हजार ३५२ लिटर केवळ बियरचा समावेश आहे.

गेल्या २ वर्षांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली जगात आहे. यामुळे याचा फटका विविध घटकांना बसला आहे.त्यावेळी आलेल्या मंदीतून अजूनही अर्थव्यवस्था उभारी घेत आहे. असे जरी असले तरी संपूर्ण कोरोना काळात तळीरामांनी नित्यनियमानुसार झिंग केली आहे आणि जिल्हातील तळीरामांच्या जोरावर मद्यकंपन्यांनी बक्कळ पैसे कमावले असल्याचे दिसून येत आहे. कारण २०२० ते २०२१ या दोन वर्षात जळगाव जिल्हात तब्बल ३ कोटी १६ लाख ६ हजार २२ लिटर इतकि दारू रिचवली आहे.

 

वाईनची विक्री सर्वात कमी

एकूण सव्वातीन कोटी लिटर दारू विक्री पैकी जिल्ह्यात सर्वात कमी विक्री हि वाईनची झाली आहे. गेल्या दोन वर्षात केवळ १ लाख ३ हजार ३२२लिटर दारूचं विकली गेली आहे.