अफगाणिस्तानच्या रशीद खानला लॉटरी

0

बंगळूरू  । आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेत यंदा अफगाणिस्तानच्या पाच क्रिकेटपटूंचाही समावेश करण्याचा निर्णय घेतला होता.  या निर्णयामुळे अफगाणिस्तानच्या रशीद खानला लॉटरीच लागली. लिलावात रशीद खान याच्यावर पदापर्णातच चार कोटींची बोली लागली आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये लक्षवेधी कामगिरी केली होती. लिलावात अफगाणिस्तानच्या पाच खेळाडूंवर सर्वांचे लक्ष होते. मोहम्मद नबीवर सर्वात आधी बोली लावण्यात आली. नबीवर सन रायझर्स हैदराबादने 30 लाखांची बोली लावून आपल्या ताफ्यात दाखल केले.  नबीने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. गेल्या दोन वर्षात ट्वेन्टी-20 मध्ये दोनशेहून अधिक धावा केल्या आहेत, तर 60 हून अधिक विकेट्स घेतल्या. नबीच्या गोलंदाजीची सरासरी देखील अफलातून राहिली होती.