अप लखनऊ-पुष्पक एक्स्प्रेसमध्ये दरोडा : विवाहितेवर अतिप्रसंग

ईगतपुरी-कल्याण स्थानकादरम्यानची संतापजनक घटना : प्रवाशांच्या सतर्कतेने दोन दरोडेखोर ताब्यात

भुसावळ : अप लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये सुमारे आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत प्रवाशांकडील सुमारे एकला खांच्या मौल्यवान वस्तूंची लूट करीत पतीसोबत प्रवास करीत असलेल्या 20 वर्षीय विवाहितेची छेडखानी करीत विनयभंग केल्याची केल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 8 रोजी रात्री घडली. गाडीने ईगतपुरी स्टेशन सोडल्यानंतर आठ दरोडेखोर गाडीत शिरले व त्यांनी बेल्ट तसेच फायटरच्या सहाय्याने प्रवाशांना मारहाण करीत त्यांच्याकडील रोकड व मोबाईल व अन्य मौल्यवान वस्तूंची लूट केली. प्रवाशांनी सतर्कता दाखवत कल्याण स्थानक आल्यानंतर दोन दरोडेखोरांना पकडले तर अन्य सहा संशयीत पसार झाले. दरोड्याच्या या घटनेने प्रवाशांची सुरक्षितता ऐरणीवर आली असून लोहमार्ग व रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यक्षमतेवरही आता प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.