अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेस 1 ते 15 जानेवारी दरम्यान दौंडमार्गे धावणार

0

भुसावळ : मध्य रेल्वेच्या अप लाईनवरील मंकी हिल व कर्जतदरम्यानच्या दक्षिण-पूर्व घाटावर इन्फ्रास्ट्रक्चर कामासाठी 1 ते 15 जानेवारीदरम्यान अप-डाऊन हुतात्मा एक्स्प्रेस कल्याणऐवजी दौंडमार्गे धावणार आहे. अप 11025 भुसावळ-पुणे व डाऊन 11026 पुणे-भुसावळ ते 15 जानेवारी दरम्यान कल्याणऐवजी दौंडमार्गे धावणार आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.