अप-डाऊन सुरतसह नंदुरबार विशेष आठ गाड्या रद्द

भुसावळ : रेल्वे प्रवाशांकडून मिळणार्‍या अल्प प्रतिसादाअभावी भुसावळ विभागातून धावणार्‍या आठ विशेष गाड्या (अप-डाऊन) पुढील सूचना मिळेस्तोवर 19 व 20 एप्रिलपासून पुढील सूचना मिळेस्तोवर रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द गाड्यांमध्ये अप-डाऊन सुरतसह नंदुरबार व मुंबई-काझीपेठ दरम्यान गाड्यांचा समावेश आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या विशेष गाड्या रद्द
डाऊन 09007 सुरत-भुसावळ विशेष गाडी 19 एप्रिलपासून रद्द करण्यात आली तर अप 09008 अप भुसावळ-सुरत विशेष गाडी 20 एप्रिलपासून रद्द करण्यात आली. डाऊन 09077 नंदुरबार-भुसावळ विशेष गाडी तसेच अप 09078 भुसावळ-नंदुरबार विशेष गाडी पुढील सूचना मिळेस्तोवर 20 एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे.

या विशेष गाड्याही रद्द
डाऊन 01057 मुंबई-अमृतसर विशेष गाडी 20 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. अप 01058 अमृतसर-मुंबई विशेष गाडी 23 एप्रिलपासून तसेच डाऊन 01251 पुणे-काझीपेठ विशेष गाडी 23 एप्रिलपासून तसेच अप 01252 काझीपेठ-पुणे विशेष गाडी 25 एप्रिलपासून सुरू होणारी पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Copy