अप-डाऊन धुळे पॅसेंजर उद्या रद्द

0

भुसावळ- मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील जामदा-शिरूड दरम्यान इंजिनिअरींग विभागातर्फे तांत्रिक कामांसाठी डाऊन 51114 धुळे-चाळीसगाव पॅसेंजर तसेच अप 51115 चाळीसगाव -धुळे पॅसेंजर 24 डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रवाशांनी याबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.