अपहृत लष्करी अधिकार्‍याचा मृतदेह सापडला

0

श्रीनगर : अपहृत लष्करी अधिकारी लेफ्टनंट उमर फैयाज यांचा मृतदेह बुधवारी सकाळी दक्षिण काश्मीरमधील शोपिया येथील हरमन चौकात आढळला. मंगळवारी उमर फैयाज यांचे अतिरेक्यांनी अपहरण केले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु बुधवारी सकाळी फैयाज यांचा मृतदेहच सापडला. अतिरेक्यांनी गोळ्या झाडून फैयाज यांच्या शरीराची अक्षरश: चाळण केली आहे.

उमर फैयाज हे कुलगाम येथील रहिवासी होते. मंगळवारी एका विवाह समारंभासाठी ते गेले असताना अतिरेक्यांनी त्यांचे अपहरण केले. नंतर त्यांच्यावर अनेक गोळ्या झाडून त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकून अतिरेकी पसार झाले. पोलिसांनी उमर फैयाज यांचा मृतदेह हरमन चौकातून ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.