अपहरण प्रकरणी मुलाच्या आई-वडिलांना न्यायालयीन कोठडी

0

जळगाव : समता नगरातील अल्पवयीन मुलीला तिच्याच परिसरातील मुलाने 26 नोव्हेंबर रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. समता नगरातील अल्पवयीन मुलीला तिच्याच परिसरातील मुलाने 26 नोव्हेंबर रोजी लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसांनी मुलाच्या आई-वडिलांना अटक करून शनिवारी न्या. के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले. न्या. कुलकर्णी यांनी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

शब्बीर अजीम खाटीक (वय 44) यांची 17 वर्षीय मुलगी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता घरातून काहीही सांगता निघून गेली. त्याबाबत 27 नोव्हेंबर रोजी खाटीक यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देऊन अविनाश प्रकाश तायडे त्याच्या दोन मित्रांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिस योग्य पद्धतीने तपास करीत नसल्याचा आरोप शब्बीर खाटीक यांनी करून गुरुवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी मुलाचे वडील प्रकाश तायडे यांना अटक केली होती. यानंतर शनिवारी पोलीसानी मुलाच्या आईला देखील अटक केली. दुपारी मुलाचे वडील प्रकाश सोनु तायडे व आई प्रमिला प्रकाश तायडे यांना न्या. के.एस.कुलकर्णी यांच्या न्यायायालयात हजर करण्यात आले. न्या. कुलकर्णी यांनी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, प्रमिला तायडे यांच्यातर्फे जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावर कामकाज होवून 15 हजारांवर संशयित प्रमिला तायडे यांचा जामीन मंजूर करण्यात आला.