अपघात नियंत्रणासाठी पोलीस अधीक्षकांचे कडक पाऊल

0

जळगाव । वाढत्या अपघात हा सद्यस्थितील गंभीर विषय झाला आहे़ अपघातात बळी जाणार्‍यांमध्ये तरूणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महामार्ग चौपदीकरण तसेच समांतर रस्त्याचा विषय मार्गी लागावा यासाठी स्वयंसेवी संस्था, सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटले आहे.मात्र अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीही पर्याय उपायोजना राबविण्यात आलेली नाही. हे अपघात नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कडक पावले उचलली आहेत.

शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, तसेच जळगाव-पाचोरा, जळगाव-औरंगाबाद या राज्यमार्गावरील वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते़ याच मार्गावरील अपघातां संख्या जास्त आहे़ त्यामुळे या मार्गावर हेल्मेट व सीटबेल्ट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे़ टप्प्याटप्याने ही मोहिम राबविण्यात येणार असून कालांतराने जिल्हाभरात या निर्णयाची अंमबजावणी करण्यात येणार आहे़ यासाठी विशेष पथक नियुक्त केले जाणार असून त्या-त्या मार्गावर त्यांचे ठिकाण ठरविले जाणार आहे़

राज्यमार्ग तसेच राष्ट्रीय महामार्गावर शासकीय अभियांत्रिकी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी अभियांत्रिकी, रायसोनी इस्टीट्युट हे महाविद्यालये तसेच, बॉश कंपनी, एमआयडीसीतील रेमंड यासारख्या कंपन्या आहेत़ जैन इरिगेशने कर्मचाजयांना हेल्मेट सक्ती केली आहे़ त्यानुसार महाविद्यालय व इतर कंपन्यांनी कर्मचारी, विद्यार्थी तसेच शिक्षकांना हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती करावी यासाठी पुढील एक ते दोन दिवसात महाविद्यालय व्यवस्थापन तसेच कंपन्यांची बैठक घेणार सुपेकर म्हणाले़