कार-ट्रकच्या धडकेत सुरतमधील पित्यासह दोघा मुलींचा मृत्यू

0

मोंढाळे गावाजवळ भरधाव ट्रकची कारला धडक ; चौघे जखमी

पारोळा- तालुक्यातील मोंढाळे गावाजवळील दळवेल पेट्रोल पंपाजवळ भरधाव ट्रक कारवर आदळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील पिता-पूत्रांसह तिघांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजेपूर्वी घडली. मयतांमध्ये पिता मुन्ना भाई शेख (45) व त्यांचे मुले हुमेरा मुन्नाभाई (5), शेख हसनेन मुन्नाभाई (7, रा.गोपीतलाव नमकवाली गल्ली, सुरत) यांचा समावेश आहे. या अपघातात शहनाज खान अफजल (16), फरजाना शेख मुजीब (50), सना सैय्यद हसीम शेख (14) आसीम शेख (30) अशी चौघा गंभीर जखमींची नावे आहेत. या चौघांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

खोळभरणीच्या कार्यक्रमास येताना अपघात
अशफाक खान यांच्या नशिराबाद येथील शिरीण बी. या गरोदर बहिणीच्या खोळभरणीच्या कार्यक्रमासाठी सुरतमधील 17 जणांचे कुटुंब दोन वाहनांनी येत असताना एक चारचाकी (जी.जे.21 ए.एन.4590) ला मोंढाळेजवळील दळवेल पेट्रोल पंपाजवळ समोरून येणारा ट्रक (जी.जे.36 डी.9975) ने जोरदार धडक दिली. या अपघातात वाहनाचा चुराडा झाला. जखमींना बहादरपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहनाने धुळे येथे उपचारासाठी हलवण्यात आले. अपघातानंतर पारोळा पोलिस ठाण्याचे हवालदार काशीनाथ पाटील व दीपक अहिरे यांनी पंचनामा केला तर ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.

Copy