Private Advt

अपघातातील ठार झालेल्या रावेर तालुक्यातील दोघा मित्रांवर अंत्यसंस्कार

रावेर : अज्ञात वाहनाच्या धडकेत रावेर तालुक्यातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. नाशिक येथून दुचाकीने येत असताना बुधवारी रात्री जळगाव येथील जैन इरीगेशनजवळ अपघात झाला. त्यात दुचाकीवरील यश वासुदेव महाजन (22, रा.रोकडा हनुमाननगर, रावेर) व सुमीत दिवाकर पाटील (26, रा.पुनखेडा, ता.रावेर) या दोन्ही मित्रांचा मृत्यू झाला. दरम्यान, शोकाकुल वातावरणात दोघा मित्रांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुचाकीवरून परतताना अपघात
यश हा मंगळवारी म्हाडाची परीक्षा देण्यासाठी नाशिकला गेला होता. बुधवारी परीक्षा आटोपल्यावर तो व त्याचा पुनखेडा येथील रहिवासी मित्र सुमीत पाटील दुचाकीने नाशिक येथून रावेरला येण्यासाठी निघाले. जळगाव जवळील जैन इरीगेशनसमोर त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात यशचा जागीच, तर सुमीतचा जळगाव येथे रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यश महाजन याच्यावर रावेर येथे, तर सुमीत पाटील याच्यावर पुनखेडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.