Private Advt

अपघातातील जखमींचा उपचारादरम्यान मृत्यू

0

जळगाव – चोपडा-गलवाडे रस्त्यावर प्रवाशी रिक्षा अचानकपणे उलटी झाल्याने अपघातात जखमी झालेले 37 वर्षीय व्यक्तीचा आज जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून जिल्हा पेठ पोलीसात नोंद करण्यात आली आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, कैलास विक्रम सोनवणे (वय-37) रा. गलवाडे ता.चोपडा हे रिक्षा चालक आहेत. 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी चोपड्याकडून गलवाडेकडे येत असतांना रस्त्यावरील हातेड स्मशानभुमीजवळ अचानक रिक्षा पलटी झाले. त्यात ते जखमी होवून पोटाला मोठा मार बसला होता. त्यांना नातेवाईकांना जळगावच्या अश्वीनी हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर नातेवाईकांनी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र शनिवारी दुपारी 4.30 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान निधन झाले. याबाबत वैद्यकिय आधिकारी डॉ. काळसकर यांच्या खबरीवरून जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत कैलास सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील, तीन भाऊ असा परीवार आहे.