…अन् संत्राचा हार घालून आमदार पोहोचले विधानभवनात

0

मुंंबई: राज्याचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु आहे. आज मंगळवारी 15 रोजी अधिवेशनाचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. काल विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी सरकारल लक्ष केले होते. अपक्ष आमदार रवी राणा यांनी काल शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी बॅनर घालून विधानसभा सभागृहात आले होते. यावर अध्यक्षांनी हरकत घेतली होते. त्यानंतर आजही आमदा रवी राणा यांनी अनोखे आंदोलन केले. संत्राचा हार घालून आमदार रवी राणांनी विधान भवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखले. दरम्यान यावेळी चांगलाच गोंधळ पहायला मिळाला. संत्रा उत्पादक शेतकर्‍यांवर राज्य सरकारने अन्याय केल्याचा आरोप आमदार रवी राणांनी केला आहे. त्याच्या निषेधार्थच आज ते संत्राचा हार घालुन विधान भवनात आले आहे.

Copy