अन् पतीने दिला चक्क व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाक

0

हैदराबाद । सध्या तिहेरी तलाकचा मुद्दा तापला आहे. रोज नवनवीन पद्धतीनर तलाक दिल्याच्या घटना समोर येत असतानाच आता पतीने व्हॉट्सअ‍ॅपवरून तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणातील हैदराबादमध्ये ही घटना घडली आहे. या पतीने व्हॉट्सअ‍ॅपवरून तीनदा तलाक असा मॅसेज टाकून पत्नीला तलाक दिला आहे. हा पती अनिवासी भारतीय आहे. पीडित महिलेचे नाव सुमायना शरीफ असून तिने या संदर्भात पोलिसात तक्रार दिली आहे. सुमानयाचे 2015 मध्ये ओवेसी तालिब या व्यक्तीसोबत लग्न झाले. तालिब दुबईमध्ये व्यवसाय करतो. लग्नानंतर सुमायनाचे काही दिवस चांगले गेले. मात्र, त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. काही महिन्यानंतर तिला चक्क घराबाहेर काढले. घराबाहेर काढल्याने ती माहेरी परत आली. तिथेच राहत होती. सुमायनाला परत घेऊन जावे यासाठी तिच्या कुटुंबीयांनी तालिबच्या कुटुंबीयांना अनेकदा संपर्क केला मात्र तालिबकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 28 नोव्हेंबरला तालिबने सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने सुमायनाच्या व्हॉट्सअ‍ॅपवर तीनदा तलाक लिहिलेला मॅसेज पाठवून तिला तलाक दिला. सुमायना हादरून गेली. सुमायनाने पोलिसांमध्ये तक्रार केल्यावर एकच खळबळ उडाली. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राजस्थानातील सुमन शर्मा यांनी तिहेरी तलाक पद्धतीचा वापर करणारे महिलांना खेळणे समजतात काय, असा संतप्त सवाल सोमवारी उपस्थित केला.