अन्वेय नाईकने आईची हत्या करून आत्महत्या केली : अर्णबच्या वकिलाचा मोठा आरोप

0

नवी दिल्ली: व्यावसायिक अन्वेय नाईक यांनी आईसह आत्महत्या केली होती, यासाठी त्यांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला जबाबदार धरले होते. २०१८ मध्ये हे प्रकरण घडले होते, पोलिसांनी चौकशी करून प्रकरण बंद केले होते. मात्र पुन्हा हे प्रकरण उघडण्यात आले असून अर्णब गोस्वामीला अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टात आज बुधवारी सुनावणीला सुरुवात झाली आहे. अर्णबच्या बाजूने वकील हरीश साळवे युक्तिवाद करत आहेत. यावेळी साळवे यांनी अन्वेय नाईक याने आईची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचा युक्तिवाद केला. अर्णबच्या वकिलाने केलेला हा मोठा आरोप आहे. सुप्रीम कोर्ट अर्णबला जामीन देते का? यावर आता लक्ष लागले आहे.

Copy