अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर आडवे पडू – मंगेश चव्हाण

चाळीसगाव (जीवन चव्हाण) – ओबीसी समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकारला सापशेल अपयश आले असून हे ओबीसी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुर्नयाचिका दाखल करून तमाम ओबीसी बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. अन्यथा मुंबईला येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गाडीसमोर आडवे पडून आंदोलन करू असा इशारा चाळीसगाव भाजपाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. चाळीसगाव येथे आमदार मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.