Private Advt

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

जळगाव : तालुक्यातील नशिराबाद येथे गावात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. या प्रकरणी सोमवार, 18 एप्रिल रोजी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात सोमवारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळाल्यावर नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. कर्मचार्‍यांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. मयताचे अंदाजे वय 60 असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहेत.