अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

0

भुसावळ- 11061 डाऊन पवन एक्सप्रेसमधून पडलेल्या अनोळखी जखमी महिलेचा 9 रोजी मृत्यू झाला. 5 रोजी प्लॅटफार्म क्रमांक चारवर 40 वर्षीय महिला डाऊन पवन एक्स्प्रेसमधून पडल्याने जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू असते. 9 रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनोळखी महिला रंगाने सावळी, शरीराने सडपातळ, उंची 5 फूट 6 इंच, डोक्यावरील केस काळेबारीक, उजव्या हातावर लालू गोंदलेले, अंगात लाल व काळी साडी, हिरवे ब्लाऊज असे तिचे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास एएसआय आर.एस.उपाध्याय यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Copy