अनोळखी तरुणाचा आढळला मृतदेह

जळगाव- जळगाव खुर्द शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वरील मुंजोबा मंदिरासमोरील रेल्वे लाइनच्या बाजूला एका सुमारे 25 ते 30 वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला. त्याच्या हातावर एस जान व एस.एम.तसेच स्टार गोंदलेले आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन नशिराबाद पोलिसांनी केले आहे