अनेक ठिकाणी मतदानयंत्रात बिघात मात्र तरीही मतदानाची टक्केवारी वाढली

0

भोपाळ-मध्य प्रदेश विधानसभेसाठी काल मतदान झाले. किरकोळ वादाच्या घटनेससह ७५ टक्के मतदान झाले. २०१३ पेक्षा यावेळी २.३४ टक्के मतदान अधिक झाले आहे. २०१३ मध्ये ७२.६६ टक्के मतदान झाले होते. २५० मतदान केंद्रावर संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत मतदानासाठी रांगा लागून होत्या. नक्षली प्रभावित बैहर, लांजी आणि परसवाडा येथे दुपारी ३ वाजेला मतदान थांबले. अनेक ठिकाणी मतदानयंत्रात बिघाड झालेले असतांना देखील यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. मतमोजणी ११ डिसेंबर रोजी होणार आहे.

Copy