अनुभूती स्कूलमध्ये सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा

0

जळगाव । मराठी राजभाषा दिनाच्या औचित्याने जळगाव येथील अनुभूती निवासी शाळेत ‘सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली होती. सुंदर हस्ताक्षरासाठी काय करावे आणि काय करू नये या बाबत सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांच्या मार्गदर्शनानुसार हा कार्यक्रम आयोजण्यात आला होता. स्कूलमधील भाषेचे शिक्षक आणि सुमारे 150 विद्यार्थी या कार्यशाळेस उपस्थित होते. सुंदर हस्ताक्षराच्या सरावासाठी पेन कसा धरावा, टोकापासून किती अंतरावर धरावा, वही अथवा ज्यावर लेखन केले जाते. त्यावर पेनाचा दाब किती द्यावा, पेन कसा निवडावा, लेखन करण्यासाठी कसे बसावे याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितले. संगणक युगाचे कितीही प्राबल्य असो आपल्याला पांढर्‍या कागदावर लेखन करावेच लागते.

लेखन करण्यासाठी केले मार्गदर्शन
अक्षर व लेखनाचे महत्त्व कदापि कमी होण्यासारखे नाही त्यामुळे लेखन करताना सुंदरच लिहिले गेले पाहिजे असा कटाक्ष प्रत्येक विद्यार्थ्याने ठेवावा असे त्यांनी सांगितले.आपण सराव करून आपल्या अक्षरांना सुंदर वळण प्राप्त करून घेऊ असा संकल्प विद्यार्थ्यांनी घेतला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन यांनी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुभूती स्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले.