अनुप जलोटा कोरोनामुळे ‘आयसोलेशन’ मध्ये

0

मुंबई: भारतातील प्रसिद्ध भजन सम्राट अनुप जलोटा यांना कोरोना विषाणूमुळे दोन दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. ते नुकतेच युरोप देशातून परत आले आहेत. खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मुंबई विमानतळावर आल्यानंतर थेट हॉटेलमध्ये पाठवण्यात आले, इतरांपासून वेगळे ठेवण्यात आल्याचे सांगितले. अनुप जलोटा हे ६६ वर्षांचे आहेत.

भजन सम्राट अनुप जलोटा हे जसलीन मथारूमुळे चर्चेत आले होते. बिग बॉसच्या सीझन १२ मध्ये अनूप यांनी जसलीसोबत स्पर्धक म्हणून या रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. या शोदरम्यान दोघांनी आपल्या नात्याचा खुलासा केला होता. जसलीन अनूप यांच्यापेक्षा ३७ वर्षांनी लहान आहे.

दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा कोरोनाच्या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवलं आहे. दिलीप कुमार यांनी स्वतः ट्वीट करत स्पष्ट केले की , ‘करोना व्हायरसचा होत असलेला प्रादुर्भाव पाहता मी पूर्णपणे इतरांपासून दूर आहे. पत्नी सायरा बानो माझ्या सुरक्षेच्या संदर्भातली एकही गोष्ट अपूर्ण सोडत नाहीत.’

Copy