अनाथांच्या निवासी शाळेत कपडे वाटप

0

शिरपूर । शिरपूर शहरात जैन धर्मियांचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी चे जन्म कल्याणक महोत्सव रविवारी 9 एप्रिल रोजी मोठ्या थाटात तारण जैन समाज बांधवांतर्फे साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. महावीर जयंती चे औचित्य साधून 8 एप्रिल रोजी तारण युवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली तारण बाल मंडळाने वघाडी येथील अनाथ आश्रम शाळेत मतिमंद विद्यार्थ्यांना मिष्टान्न व कपडे वाटपाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.

तारण बाल मंडळाने नवीन उपक्रम राबवून तारण जैन समाजात आदर्श दाखविला. या उपक्रमाचे समाज बांधवांकडून कौतुक केले जात आहे. यासाठी तारण जैन समाजातील तारण युवा मंडळ , किरण जैन , आदेश जैन , सचिन जैन , रूपेश जैन , विजय जैन , आणि तारण बाल मंडळाचे रोनक जैन , मोहित जैन , चिन्मय जैन , समय जैन , तेजस जैन , स्वर्णिम जैन , यश जैन आदी समाजबांधवांनी परीश्रम घेतले.