…अधिवेशन चालू देणार नाही।

0

भिवंडी (रतनकुमार तेजे) : भिवंडी महानगरपालिकेतील सभागृह नेता मनोज म्हात्रे यांच्या हत्ये नंतर त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आज भिवंडीत मनोज म्हात्रे यांच्या अंजूरफाटा येथील घरी आले होते . त्यांनी जो पर्यंत मनोज म्हात्रेंच्या हत्येतील आरोपी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही तो पर्यंत येणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही अशी घोषणा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे
भिवंडी शहरातील जेष्ठ नगरसेवक महानगरपालिका सभागृह नेता मनोज म्हात्रे यांची त्यांच्या राहत्या घरा खाली दिनांक 14 फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली . या घटने बद्दल संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात असतानाच आज शोकाकुल म्हात्रे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे भिवंडी शहरात आले होते .

नारायण राणे यांनी कुटुंबीयांची भेट घेतल्या नंतर घटनास्थळाची पाहणी करून पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांच्याशी चर्चा करून गुन्ह्याच्या तपासाची माहिती घेतली . त्या नंतर पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मनोज म्हात्रे यांच्या हत्येचा निषेध करीत , मुख्यमंत्री सांभाळीत असलेले गृहमंत्रालय निष्क्रिय झाल्याने गुंडाना पक्षात प्रवेश देतात ,पदे देतात तर पोलीस तरी काय करतील असा सवाल उपस्थित करीत जो पर्यंत मनोज म्हात्रे हत्येतील आरोपी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहि तो पर्यंत आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही अशी घोषणा काँग्रेस पक्षाच्या वतीने केली .

म्हात्रे कुटुंबीयांची भेट घेत असताना स्वर्गीय मनोज म्हात्रे यांच्या मातोश्री यमुनाबाई यांनी आपल्या मुलाच्या हत्येतील आरोपी हा या घटने नंतर खासदार कपिल पाटील यांच्या घरी पळून गेला असा आरोप रागाच्या भरात केला आहे . या हत्येतील मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे हा भाजपा भिवंडी शहर उपाध्यक्ष असल्या बाबत विचारले असता नारायण राणे यांनी या प्रश्नावर बोलताना भाजपा आता काही हि सांगत असली तरी मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रे याचे स्थानिक आमदार व खासदार यांच्या सोबत संबंध असल्याचे पुरावे आमच्या कडे आहेत असे सांगितले . या बाबत आम्ही योग्य वेळ आल्यावर बोलू असेही त्यानी सांगितले.