अधिक दडपण न घेता खेळणार

0

नवी दिल्ली: अधिक दडपण न घेता ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत खेळणार असल्याचा निर्धार रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने केला आहे. ही स्पर्धा इतर सुपर सीरिज स्पर्धेप्रमाणेच असेल, असे मत तिने व्यक्त केले. ७ ते १२ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. सिंधू पुढे म्हणाली की, नावावरून ही खूप मोठी स्पर्धा असल्याचे लोक विचार करत असतील. मात्र एक खेळाडू म्हणून मला सुपर सीरिज स्पर्धामध्ये सामोरे जावे लागणाऱ्या खेळाडूंविरुद्धच येथे खेळायचे आहे. त्यामुळे माझ्यासाठी या दोन्ही स्पर्धा समान आहेत, असे सिंधू म्हणाली. ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धेत २०१५साली सायना जेतेपदाच्या समीप आली होती, परंतु ऑलिम्पिक विजेत्या कॅरोलिना मारिनकडून तिला पराभव पत्करावा लागला.